शिरडी साईं बाबा के कई मंदिरों में सुबह के समय काकड आरती की परंपरा निभाई जाती है. यह आरती भगवान को जागृत करने और दिन की पूजा-अर्चना की शुरुआत के रूप में की जाती है. शिरडी साईं बाबा की काकड आरती भी इसी परंपरा का हिस्सा है और इसे अलग-अलग भजनों व आरती के चरणों में प्रस्तुत किया जाता है. मान्यता है कि आरती करने से बाबा की असीम कृपा मिलती है. जीवन की बाधाएं और समस्याएं कम होती हैं. साथ ही, मन में संयम, धैर्य और बाबा के प्रति अटूट विश्वास मजबूत होता है.
चिन्मयरूप काकड आरती
काकड आरती करीतों साईनाथ देवा ।
चिन्मयरूप दाखवीं घेऊनि बालक-लघुसेवा ।।धु० ॥
काम क्रोध मद मत्सर आटुनी कांकडा केला।
वैराग्याचे तूप घालुनी मी तो भिजविला ।
साईनाथगुरूभक्तिज्वलनें तो मी पेटविला ।
तवृत्ती जाळूनी गुरूनें प्रकाश पाडीला ।
द्वैत-तमा नासूनी मिळवी तत्स्वरूपी जीवा । ॥ चि० ॥१॥
भू-खेचर व्यापूनी अवघे हृत्कमलीं राहसी ।
तोचि दत्तदेव शिरडी राहुनी पावसी ।
राहनी येथे अन्यत्रहित भक्तांस्तव धावसी।
निरसुनिया संकटा दासा अनुभव दाविसी ।
न कळे त्वल्लीलाही कोण्या देवा वा मानवा ।। ॥ चि० ॥२॥
त्वद्यशदुदुंभीने सारे अंबर हे कोंदलें ।
सगुण मूर्ति पाहण्या आतुर जन शिरडी आले ।
प्राशुनी त्वद्वचनामृत अमुचे देहभान हरपलें ।
सोडूनियां दुरभिमान मानस त्वच्चरणीं वाहिले ।
कृपा करूनियां साईमाउले दास पदरी घ्यावा ।। ॥ चि० ।।का० ।।चि० ।।३।।
पंढरीनाथा काकड आरती
भक्तिचिया पोटीं बोधकांकडा ज्योती ।
पंचप्राण जीवेंभावे ओवाळू आरती ॥१॥ .
ओवाळू आरती माझ्या पंढरीनाथा ।
दोन्ही कर जोडोनी चरणी ठेविला माथा ॥ध्रु.॥
काय महिमा वर्ण आतां सांगणे किती ।
कोटी ब्रह्महत्या मुख पाहतां जाती ।।२।।
राई रखुमाबाई उभ्या दोघी दो बाहीं।
मयुरपिच्छ चामरें ढाळिति ठायी ठायी ॥३॥
तुका म्हणे दीप घेउनि उन्मनीत शोभा ।।
विटेवरी उभा दिसे लावण्यगाभा ।। ४ ।। ओवाळू।।
पद (उठा उठा)
उठा साधुसंत साधा आपुलाले हित ।
जाईल जाईल हा नरदेह मग कैंचा भगवंत ।।१।।
उठोनियां पहाटें बाबा उभा असे विटे।
चरण तयांचे गोमटे अमृतदृष्टी अवलोका ।।२।।
उठा उठा हो वेगेंसीं चला जाऊंया राउळासी।
जळतील पातकांच्या राशीकांकड आरती देखिलिया ।।३।।
जागें करा रूक्मिणीवर, देव आहे निजसुरांत ।
वेगें लिंबलोण करा दृष्ट होईल तयासी ।। ४ ।।
दारी वाजंत्री वाजती ढोल दमामे गर्जती ।।
होते कांकड आरती माझ्या सद्गुरूरायांची ।।५।।
सिंहनाद शंखभेरी आनंद होतसे महाद्वारी ।
केशवराज विटेवरी नामा चरण वंदितो ।।६।।
साईनाथगुरू माझे आई। मजला ठाव द्यावा पायीं ।।
दत्तराज गुरू माझे आई । मजला ठाव द्यावा पायीं ।।
श्रीसच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय ।
-----समाप्त-----